माझी Marlish कविता
Cockatail चा ह्या जमान्यात म्हणलं...एक marlish कविता मी पण लिहावी.
ह्यात फार deep विचार वगैरे काहीच नाही...इतकाच कि creative खिचडी करावी.
कविता करायला विषय हवा ...असा कधी problem ह्या आधी आला नाही.
खरं सांगायचं तर instant कविता करण्यासाठी हि सगळी घाई.
झाडं, फुलं-पानं, life... हे अगदीच झालेत main stream विषय.
Subject काही असला तरी...त्यात थोडा तरी असावा आशय.
English लिहीत असताना...मराठी लिखाण होत गेले secondary.
कुठल्याही भाषेत लिहावे... आपल्या विचारांचा track सदैव राहतो मराठी.
PC ला laptop ने replace केले , आता पत्रं नाहीत, आता e -mail.
English मराठी यमक जुळवताना...मी ठरायला नको अगदीच fail.
मराठी मन, मराठी विचार...त्याला थोडीशी english ची aid.
Language barrier नसतोच कधी, फक्त लिहायचे असावे वेड!
Masttt zakkas
ReplyDeleteNice
ReplyDelete