आमची गोष्ट..
एक दिवस एकदम रंगात आली होती आजीची आणि माझी जोडी . तसं आपलं नेहमीचंच … गप्पा , गावांच्या भेंडया , आडनावांची कोडी . Gallery मध्ये बसून , समोरचा कृष्णेपेक्षा आमचा होत्या खूपच वेगवान गप्पा . पटापट गोष्टी बदलत होत्या … विषय अवघड असो वा सोपा . पारिजातकाच्या बहरलेल्या झाडाकडे बघून आजी स्वतःशीच हसत होती . मनातल्या मनात नक्कीच कुठली तरी कविता ती रचत होती . लक्षात येताच मी लगेच आजीला विचारलं , " कसला ग विचार करत्येस आजी ?" ती माझ्याकडे बघून हसून म्हणाली , " कशी ग़ सुंदर आहे हि बाग माझी . माझी नाही आपली ! हि झाडं , फुलं , पान … हे सगळ्यांचच असतं . तुझं माझं , आपलं दुसऱ्याच ह्यात असं काहीच नसतं ! हे बघ सुस्मिता , ह्याच परीजाताकाप्रमाणे फुलून खूप मोठं व्हायचं , स्वतःसाठी तर आहेच … पण थोडं दुसऱ्यासाठी हि जगायचं . तगरी , जास्वंद , चाफ्या सारखे आयुष्यातही असतात वेग - वेगळे रंग . तुझ्हा आता आभ्यास झाला कि मग सांगते , मला आठवतायत खु...