चार 'बाप' गोष्टी

Father's Day ला Father नी सांगितलेल्या किंवा Father बद्दल काहीतरी लिहिणं mandatory आहे . आज Father's Day निमित्त मी सांगणार  आहे अशा चार 'बाप' गोष्टी ज्या माझे बाबा मला नेहमी सांगत आले आहेत . त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल कि माझ्या ह्या गोष्टी फक्त लक्षात नसून... मी त्या कधी कधी आचरणातही आणल्या आहेत.

१. कपडे, दागिने  ... असा क्षणिक गोष्टींवर फार वेळ वाया घालवू नकोस. ज्या गोष्टी आपल्याला काही महिन्यात बदलायचाच आहेत त्याच्यावर काही तास ही वाया घालवणं worth नाही.
२. खूप वाच ... अगदी जे मिळेल ते वाच. वाचायचा मला नेहमीच कंटाळा आलेला असतो. पण Facebook म्हणा , Quora म्हणा किंवा कितीही नाही ठरवलं तरी बाबानी पाठवलेले मोठे मोठे WhatsApp फॉर्वर्डस.. वाचतेच!
३. खूप ऐक ...शिक ... सगळ्याच वक्त्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ऐकून तर मी कधीच कोणाचा घेत नाही. पण गोष्टी कानावर पडतात...त्या लगेच पटतही नाहीत. पण कधीतरी असाच एकटं बसून विचार करताना जाणवतं...अरे हो ... हे अगदीच खरं आहे.
४. चौथी आणि सगळ्यात important गोष्ट .... तुला पटेल तेच कर, तुझं  १०० % दे  आणि प्रामाणिकपणे कर.

आई बाबा जेव्हा हे सगळं सांगतात... तेव्हा "का हे lecture देतायत", असा वाटतं! पण कुठेतरी त्यांनी  मनाचा आणि डोक्याचा  कोपऱ्यात entry केलेली असते आणि काही काळाने का असो पण ते पटतं.

म्हणून सहजच असं हे  Father's Day Special..... बाबा.. तुम्ही सांगत राहा...मी ऐकत्ये! ;)

Comments

Popular posts from this blog

X is the new Y

8 Beautiful Non-English Words You Should Steal Right Away

Longing