फक्त मला भिजवायला येणारा पाऊस!

आयुष्यात ही पहिलीच गोष्ट अशी होती जी फक्त अन् फक्त मज्यासाठीच घडत होती....
बरोबर अवरून collegeला निघाले...की लावलीच पावसाने हजेरी. हा प्रकार सलग तीन-चार दिवस घडत राहिला. एरवी इतका आवडणारा पाऊस, त्या क्षणाला कसा एकदम नकोसा झाला!
मी तशीच भिजत भिजत (raincoat असूनही..ज्याचा फारसा काही उपयोग होत नाही) collegeला पोहोचले....आणि पाऊस एकदम गायबच! आणि मजा म्हणजे कॉलेज मध्ये मी एकटीच भिजलेली होते...बाकी सगळे छान कोरडे..इतका embarrassing वाटत होता खर म्हणजे!
पण तीन दिवसांनी या प्रकारची मला सवय झाली होती आणि इतरांना मला गच्च भिजलेल पहायची. मग अचानक डोक्यात एक विचार आला..जो एक मैत्रिणीने पटवुनही दिला. नेमकी मीच कशी भिजते या पावसात..का जणू मलाच भिजवायला येतो हा पाऊस!
मग अचानक या चिडचिडिचे रूपांतर आनंदात झाले...त्या क्षणी सगळे tensions, problems एकदमच विसरले. Collegeमधून घरी जाताना पुन्हा पाऊस पडत होता..पण आता तो अगदी हवा-हवसा वाटत होता..घरी आल्यावर खूप खुश दिसत असेन मि कदाचित...सगळे मला माझ्या आनंदाचा कारण विचारत होते..पण कोणाला अणि काय सांगणार...हे माझा आणि 'त्याच' गुपित होतं ना...तो कोसळणारा पाऊस फ़क्त माझ्याचसाठी होता!

Comments

Popular posts from this blog

X is the new Y

8 Beautiful Non-English Words You Should Steal Right Away

Longing