वर्गात केलेली कविता !
वर्गात बसल्या-बसल्या सहज
सुचली एक कविता…
मि म्हणाले स्वतःला, लिहूनच
टाकूया आता !
Madam ओरडल्या
तेवढ्यात, माझे लक्ष
नव्हते ना त्यांचाकडे
…
मी तरी काय
करणार… कळत नव्हते
फळ्यावरील शब्द वेडेवाकडे
!
कोणास ठाउक का
? त्या दिवशी रमतच नव्हते
मन alpha betaत ….
ते वावरत होते दूर
कुठल्यातरी वळणा-वळणाच्या
घाटात!
सपाट,गुळ्गुळीत,मोकळया रस्त्यावर
… मन जात होते
दूर दूर..
मस्त,मोकळ्या,गार हिरवळीचा अन माझा
जुळू लागला सूर
!
धुंद,मुक्त,छान हवेत जवळपास
हरवलेच होते माझे
मन…
तेवढ्यात
madamनी मला विचारले
,"पेंडसे ,what is linear
expansion ?"
खटकन शुद्धीवर आले...प्रश्न
घुसवत होते डोक्यात
…
पण कसं काय
येणार उत्तर ? मन
तर अजूनही होता त्या आनंदी
मुक्त जगात !
loved it
ReplyDelete......त्या दिवशी रमतच नव्हते मन alpha betaत ….<3