आमची गोष्ट..
एक दिवस एकदम
रंगात आली होती
आजीची आणि माझी
जोडी.
तसं आपलं नेहमीचंच…
गप्पा, गावांच्या भेंडया, आडनावांची
कोडी.
Gallery मध्ये
बसून, समोरचा कृष्णेपेक्षा
आमचा होत्या खूपच
वेगवान गप्पा.
पटापट गोष्टी बदलत होत्या
… विषय अवघड असो
वा सोपा.
पारिजातकाच्या
बहरलेल्या झाडाकडे बघून आजी
स्वतःशीच हसत होती.
मनातल्या मनात नक्कीच
कुठली तरी कविता ती रचत
होती .
लक्षात येताच मी लगेच
आजीला विचारलं ,
"कसला ग विचार करत्येस
आजी ?"
ती माझ्याकडे बघून हसून
म्हणाली ,
"कशी ग़ सुंदर
आहे हि बाग
माझी .
माझी नाही आपली!
हि झाडं, फुलं,
पान … हे सगळ्यांचच
असतं .
तुझं माझं , आपलं दुसऱ्याच
ह्यात असं काहीच
नसतं !
हे बघ सुस्मिता,
ह्याच परीजाताकाप्रमाणे फुलून
खूप मोठं व्हायचं,
स्वतःसाठी तर आहेच…
पण थोडं दुसऱ्यासाठी
हि जगायचं.
तगरी, जास्वंद , चाफ्या सारखे
आयुष्यातही असतात वेग-वेगळे रंग.
तुझ्हा आता आभ्यास
झाला कि मग
सांगते ,
मला आठवतायत खुप छानश्या ओव्या आणि
अभंग !
खूप सारी छान
छान माणसं असतात
,
असतात त्यांचा अनेक गोष्टी
व आठवणी .
असेच कधी-कधी
जुळतात सूर आणि
,
एकाला ऐकू येतात
दुसऱ्याचा मनातली गाणी!"
पुन्हा गप्पांचा विषय बदलला…अखेर संपली
आमची त्या दिवशीची
गोष्टं.
पण आजी तेव्हा
काय म्हणाली, हे
खरं म्हणजे मला
कळलं नव्हतं स्पष्ट.
पाहिला बहरलेला तो पारिजातक
परवा खूप दिवसांनी,
मग लक्षात आलं, आमची
गोष्टं तर होती
कधी न संपणारी.
प्रत्येक 'मी ' साठी
असतो एक 'अच्चा
आणि बच्चा',
आठवणीत सदैव जगतो
माणूस, फक्त तो
असावा लागतो सच्चा!
Comments
Post a Comment